औषधं आणि आम्ही ! MEDICINE AND WE !

औषधं आणि आम्ही ! MEDICINE AND WE…..!

आजकाल आजारी होताच लोक इस्पितळात धाव घेतात. घरघुती उपाय पूर्वीसारखे राहिलेच नाहीत. ते करता येतील पण ते करण्यासाठी एकतर कोणाकडे वेळ नसतो किंवा माहिती..
आजारी पडल्यावर उपचार करणे हे जितके योग्य असते तेवढेच महत्वाचे आपल्याला शरीराला ओळखणे.
ताप येणं हा काही आजार नसतो , आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाची जाणीव तो करून देत असतो . ताप आल्यावर औषधं घेणं जितकं आवश्यक तेवढाच हा ताप का आला याच कारण शोधणं.
शरीर हे एक असं यंत्र आहे कि त्यात झालेला बिघाड ते काही टक्के स्वतःहून बर करतो. शरीराची
रोग प्रतिकार शक्ती ते काम करत असते.
आपण बरेचदा बघतो एखादी जखम झालेली असताना ती बरी होताना त्यावर आपोआप आवरण येत जाते. रक्त काही अंशी निघून गेल्यावर कोणतेही औषधं न लावताही तेथे रक्ताच्या गुठळ्या होऊन रक्त बाहेर येण्याचे थांबते.
विषय इथे संपत नाही . महत्वाचे हे कि प्रत्येकाने आपल्या शरीराला ओळखणे खूप महत्वाचे असते.
मानसिक स्थिती मुळेही शरीरावर बरेच परिणाम होत असतात. उत्तम मानसिक अवस्था शरीराला उत्तम ठेवते. तेच ती ढासळली कि त्याचा वाईट परिणाम शरीर दर्शवते.
बाजारात सध्या औषधं कंपन्यांच्या जाहिराती करणाचा सुळसुळाट चालू आहे. आजारांवर बरीच औषधे उपलबद्ध देखील आहेत. पण ती किती आणि कितपर्यंत घ्यावी यासाठी नेहमी जागरूकता ठेवावी. हल्ली नेट च्या युगात माहिती मिळणे तसे फार अवघड राहिले नाही. आपण ज्या औषधांचा भडीमार आपल्या शरीरावर करत आहोत त्या आपल्या शरीरावर काय परिणाम करतात याची माहिती देखील जागरूक राहून शोधून काढावी.
आपल्या शरीरात कमी असलेल्या गोष्टींची झीज भरून काढण्यासाठी आपल्या रोजच्या खाण्यातले पदार्थ देखील फायदेशीर ठरतात. रोज हलका व्यायाम , पुरेसा सूर्यप्रकाश, आहारातले पथ्य , निरोगी मन, रोग प्रतिकार शक्ती वाढेल असे घरगुती अन्न हे एवढे पुरेसे असते सुदृढ राहण्यासाठी.
तेव्हा म्हणचे ऐकावेच पण शरीराचेही ऐकावे.. तेही बोलत असतेच आपल्याशी …संवाद साधता आला पाहिजे …आपल्या शरीराला आपल्यापेक्षा जास्त कोणीच जाणत नसत…
“शेवटी काय तर सर सलामत तो पडगी पचास !

Leave a comment