प्रिय पप्पांस,


आज गुगल वर शोधत होते तुम्हाला , म्हणतात तिथे सगळं काही भेटत. सर्च केलं तुमचं नाव… तुमचं नाव आलं.. पण तुम्ही नाही भेटलात. माझ्यासाठी माझं छत्र गेलं , जाताना जराही वाटलं नाही का ? माझ्या मुलीची काय अवस्था होईल? असं म्हणतात लोक माणूस गेल्यावर लोक १२ दिवस दुःखच पाळतात. नंतर काळाच्या ओघात जखम भरून निघते. माणसं विसरतात. पण मी ,,, मुलगी आहे तुमची. मी अजून माझ्या हृदयात तुम्हाला जिवंत ठेवलंय. प्रत्यक्षात तुम्ही नाही भेटत मला. पण तुमच्या आठवणी आहेत माझ्या सोबत. शब्द आहेत धीर देणारे.
आज फार आठवण येतेय तुमची. माहित नाही का. तशी रोज येतेच.
एका लहानशा बाळाला समोर ठेवून जगतेय. तस आयुष्य जगण्यासाठी काहीच बाकी राहील नाही माझ्या जवळ. मला वाटत यावं तुमच्यापाशी. पण माझा कार्यभाग अजून आटपला नाही.
किती वेळ लागेल माहित नाही. पण जेव्हा ऋणातून मुक्त होईन . सगळ्यात आधी तुम्हाला भेटेन.
अजून बऱ्याच गोष्टी आहेत. प्रारब्ध आहेत. पूर्वसंचितात काय लिहून ठेवलंय माहित नाही.
बाळाचा सांभाळ त्याच्यावर सोपवलंय. जेव्हा कोणाचं कोणी नसत तेव्हा तोच असतो ..परमेश्वर !
माझ्या बाळाच्या संगोपनात काही कमतरता राहू नये या साठी मला आशीर्वाद द्या. त्याला उदंड आयुष्य लाभो , तो सुधृढ आणि यशस्वी होवो , सामर्थ्यवान होवो यासाठी आशीर्वाद द्या !
माझी जगायची फारशी इच्छा नाही. पण जगण्यासाठी एक कारण आहे माझ्या कडे!
माझी जबाबदारी पूर्ण झाली कि मी येईन भेटायला तुम्हाला.
तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असूद्यात !
तुमची मुलगी

Leave a comment