ALL THAT GLITTER IS NOT GOLD !
समर्थ रामदासांच्या श्रीमत दासबोधातील ग्रंथातील अठराव्या दशकातील सहावा समास, पहिली आणि दुसरी ओवी…
समर्थाना लोकांकडून कोणत्या पद्धतीचे आचरण अभिप्रेत आहे हे या ओव्यांमधून आकलन होते.
समर्थ म्हणतात लोक नाना प्रकारचे वस्त्र परिधान करतात , त्यावर साजेसे दाग दागिने देखील घालतात. पण हे झाले देहाचे. देहाचा शृंगार करणे तितके कठीण नाही. ते कोणीही करेल. परंतु आपला देह जसा सुंदर दिसायला हवा असे आपल्याला वाटते तसेच आपले अंतर देखील असावे. अंतर म्हणजे अंत:करण.
अंत:करणं म्हणजे मनाचा आरसा. कधी ते दुःखी असत कधी सुखी , कधी निराश तर कधी सुखी , कधी पवित्र तर कधी अपवित्र. कधी समाधानी तर कधी असंतुष्ट. तेव्हा जर तेच उत्तम नसेल तर वर वरून देहाला सजवून काहीच उपयोग होत नसतो, तेव्हा माणसाने सबाह्य अभ्यंतरीं …. बाहेरून आणि आतून दोन्हीकडून सुंदर असायला हवं.. नुसता वर वरचा देखणे पणा पुरेसा नाही…!!
एक सुंदर उदाहरण आहे ….कुठेतरी ऐकलेलं ….
एकदा एका नामवंत कंपनीसाठी योग्य उमेदवाराची गरज होती. बरेच जण नोकरीसाठी मुलाखत द्यायला आले होते. खूप मोठी रांग लागली होती. मुलाखतीसाठी उत्तम भाषा कौशल्य असणारे , पदवीधर अगदी सूट बूट घालून उत्तम तयारी करून आले होते . मुलाखत देण्यासाठी जो कोणी आत जायचा तो घाम पुसत बाहेर यायचा. कोणालाच काही कळेना, बरे आधी आतमध्ये काय झाले हेही विचारायची हिम्मत होत नव्हती. असे करता करता एक व्यक्ती आत गेला. त्याला सांगितले तुम्ही ज्या ऑफिस मध्ये उभे आहेत त्या ऑफिसच्या खिडकीतून खाली उडी मारा..
ऐकणाऱ्याचे धाबे दणाणले.. तो अचंभित झाला . त्यापेक्षा हि अशी नोकरी न केलेली बरी असे म्हणून बाहेर निघून गेला. ५ व्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारायची …. हि काय मुलाखत घ्यायची पद्धत आहे का…!असे बोलून तो निघून गेला…!
तेव्हा गावाकडून आलेला एक साधा गरीब मुलगा आत गेला , फारसा तयार नाही पण नीटनेटका , खूप जास्त भाषा त्याला ज्ञात नसल्या तरी आपले म्हणणे समोरच्या पर्यंत पोहोचेल , पटेल इतकं माहित असलेला.
तो आत गेला , त्याला देखील तेच सांगितले जे आधीच्या मुलांना सांगितले गेले.
खिडकीवरून खाली उडी मारा ….
तो खिडकीपाशी गेला , खिडकीच्या बाजूला असलेल्या आधाराला धरून चढला. तिथे उभं राहण्यासाठी पुरेशी जागा होती.. त्याने खिडकीवरून ऑफिस मध्ये उडी मारली ….
आणि तो पास झाला… त्यांना हवा असलेला कम्पनीचा भावी उमेदवार …संकटाचा वेगळ्या पद्धतीने विचार करणारा..
हो,,, कारण खिडकीतून खाली उडी मारा इतकाच सांगितलं होत… कुठे उडी मारा हे नाही !!
त्यांना जे अपेक्षित होत अगदी तेच त्या मुलाने केलं… कारण त्याने त्याच्या जवळचं चातुर्य वापरलं!
आणि तो जिंकला !!!
म्हणून समर्थ म्हणतात
श्रीराम ॥ नाना वस्त्रें नाना भूषणें । येणें शरीर श्रृंघारणें । विवेकें विचारें राजकरणें । अंतर श्रृंघारिजे ॥ ११ । शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केले सज्ज । अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे..



